शंख चक्र गदा पद्म
ऐसे दाविले रूप अनंत
जैसा कृष्ण उभा सदनी
तैसी दिली मज प्रचिती ।।१।।
कृपावर्षे केले सधन
मन झाले तेणे सघन
नेत्र गंगा तीर झाले
मन शिव शिव केले ।।२।।
ऐसे करूणेचे मेघ
केले अवचित वरूण
देह सोनियाचा करून
केले अपुलेसे मज ।।३।।

Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta