Poetry
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: बेहोष मी बेहोष मी
जगी हिंडोनी जगवेगळा।।
होषात ज्यांच्या जग हे असे
धन दु:ख दारा लोभ जे
गळुनी हिशोब हे मी तू चे
नाते नवीन हे जन्मले।।१॥
अवनीवरी प्रेमा असा
निर्मून देवाचा ठसा
बेहोष तरलो आज मी
त्यागून ही तम संस्रुती ।।२।।
उतरून घाट गंगे तुझे
मन शुध्द झुळझुळ वाहते
फोडून पत्थर अहमीचे
हे घाट सुंदर बांधिले।।३।।
घनमेघ गभीर गर्जती
आकाश ह्रदयी जन्मले
जोडून तीरद्वय चमकते
सप्तचक्री इंद्रधनू।।
बेहोष मी बेहोष मी
जगी हिडूनी जगवेगळा।।
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: त्यागून दुनियादारी ही
मनी ज्योत तळपे ती तुझी
ह्रुदयीच प्रीती ईश्वरी
गात्रा परौती जी सखी।।५।।
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: ह्रदयात तू नि मी कुठे
हरपलेचि माझे सर्व ते
ऐशा विरागी अनुभवी
पाहू कुठे जाऊ कुठे ॥६॥
बिलगून मजला रोज जे
ते क्रोध मोह गेले कुठे
छायेत तुझिया स्वप्न ते
अजि येथ वेडे गवसले॥७॥
बिंबात प्रतिबिंब हे
डोळा जशी द्रुष्टी वसे
मेघात आहे वीजही
जल तेथ कैसे नांदते॥८॥
बेहोष मी बेहोष मी
जगी हिंडोनी जगी वेगळा॥
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: हा होष जगी या नियम की
तो होष मज विष सम असे
त्याहून सर्प हे स्वप्नीचे
जे निद्र जगीची तोडती।।९।।
निद्रेत माझे गवसले मज
जे जगा ना समजते
दृश्यात दृष्टी विरघळे
ते स्वप्न माझे अलगसे।।१०।।
ऐशा सुखाच्या सत्यराशी
ऐसी अानंदी पौर्णिमा
चंद्राविणा चमचमतसे
नभअंगणी ही अंगना।।११।।
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: विरहात तू ही रास ओतूनी
तो काळ घेसी शोषूनी
स्मरसूख माझे ऊन सोने
अंगणात अवघे पसरले।।१२।।
तू मेघ होउनी दुर नभी
अंगण अवघे झाकोळले
नी चंद्र माझा सोबती
उसवून मजला तो नभी।।१३।।
अंगणात अवस घन दाटली
नभी पूर्ण चंद्र विलसता
मी अधर भान अंगी उभा
बेभान चंदन उधळूनी ।।१४।।
Sent from my iPhone
जगी हिंडोनी जगवेगळा।।
होषात ज्यांच्या जग हे असे
धन दु:ख दारा लोभ जे
गळुनी हिशोब हे मी तू चे
नाते नवीन हे जन्मले।।१॥
अवनीवरी प्रेमा असा
निर्मून देवाचा ठसा
बेहोष तरलो आज मी
त्यागून ही तम संस्रुती ।।२।।
उतरून घाट गंगे तुझे
मन शुध्द झुळझुळ वाहते
फोडून पत्थर अहमीचे
हे घाट सुंदर बांधिले।।३।।
घनमेघ गभीर गर्जती
आकाश ह्रदयी जन्मले
जोडून तीरद्वय चमकते
सप्तचक्री इंद्रधनू।।
बेहोष मी बेहोष मी
जगी हिडूनी जगवेगळा।।
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: त्यागून दुनियादारी ही
मनी ज्योत तळपे ती तुझी
ह्रुदयीच प्रीती ईश्वरी
गात्रा परौती जी सखी।।५।।
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: ह्रदयात तू नि मी कुठे
हरपलेचि माझे सर्व ते
ऐशा विरागी अनुभवी
पाहू कुठे जाऊ कुठे ॥६॥
बिलगून मजला रोज जे
ते क्रोध मोह गेले कुठे
छायेत तुझिया स्वप्न ते
अजि येथ वेडे गवसले॥७॥
बिंबात प्रतिबिंब हे
डोळा जशी द्रुष्टी वसे
मेघात आहे वीजही
जल तेथ कैसे नांदते॥८॥
बेहोष मी बेहोष मी
जगी हिंडोनी जगी वेगळा॥
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: हा होष जगी या नियम की
तो होष मज विष सम असे
त्याहून सर्प हे स्वप्नीचे
जे निद्र जगीची तोडती।।९।।
निद्रेत माझे गवसले मज
जे जगा ना समजते
दृश्यात दृष्टी विरघळे
ते स्वप्न माझे अलगसे।।१०।।
ऐशा सुखाच्या सत्यराशी
ऐसी अानंदी पौर्णिमा
चंद्राविणा चमचमतसे
नभअंगणी ही अंगना।।११।।
19/10/16, 10:26:01 PM: Narendra: विरहात तू ही रास ओतूनी
तो काळ घेसी शोषूनी
स्मरसूख माझे ऊन सोने
अंगणात अवघे पसरले।।१२।।
तू मेघ होउनी दुर नभी
अंगण अवघे झाकोळले
नी चंद्र माझा सोबती
उसवून मजला तो नभी।।१३।।
अंगणात अवस घन दाटली
नभी पूर्ण चंद्र विलसता
मी अधर भान अंगी उभा
बेभान चंदन उधळूनी ।।१४।।
Sent from my iPhone